बन विभागातील ‘रेंजर्स’वर करोनाचा मानसिक परिणाम

पन्नासहून अधिक संरक्मित क्षेत्रांत सर्वेक्षण

लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर : जंगलाच्या संरक्षण व संवर्धनात वनखात्यातील रोजंदारी मजुरांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत (रेंजर्स ) सर्वांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. माणूस आणि निसर्ग यात संतुलन राखण्याचे महत्त्वाचे कार्य ते पार पाडतात. संघटनात्मक, व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवर त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असतानाच आता करोनाकाळात ही आव्हाने आणखी वाढली आहेत. करोनाचा रजर्सवर होणारा परिणाम आणि आरोग्य सेवा क्षेत्रात त्यांची भूमिका’ या अभ्यासात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जगभरातील ६० देशांमध्ये आणि भारतातील १८ राज्यांमधील ५०हून अधिक संरक्षित क्षेत्रात हे सर्वेक्षण करण्यात आले. करोनाचा रेंजर्सवर आणि संरक्षित क्षेत्राच्या संरक्षण व संवर्धन करण्याच्या त्यांच्या कार्यावर कसा परिणाम झाला, याचा अभ्यास करण्याकरिता ऑनलाईन प्रश्‍नावलीचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबीयांना देखील प्रश्‍नावली देण्यात आली. टाळेबंदीत जंगलावरचा कोणता धोका जास्त वाढला, अतिक्रमण, अवैध वृक्षतोड, शिकार यापैकी कोणत्या
घटना अधिक घडल्या. संरक्षित क्षेत्रावर काय परिणाम झाला, असे ‘परन विचारण्यात आले. टाळेबंदीच्या काळात करण्यात आलेल्या ३० टक्के कपातीचा परिणाम जंगल संरक्षणावर झाला. त्यामुळे निधीअभावी काम करताना अनेक अडचणी आल्या. ही स्थिती देशभरात आढळून आली. करोना आणि टाळेबंदीमुळे जे अधिकारी जंगलातच अडकून पडले, त्यांच्या कुटुंबीयांना देखील याचा त्रास
सहन करावा लागला. अन्नधान्य, दैनंदिन गरजेच्या वस्तू तसेच वैद्यकीय सुविधेसाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागले. परिणामी, कुटुंबीयांना होणार्‍या या त्रासाचाही त्यांच्या
मानसिकतेवर परिणाम झाला. संघटनात्मक, व्यावसायिक आणि बैयक्तिक अशा तिन्ही पातळीवर परिणाम झाल्याचा निष्कर्ष या अभ्यासात काढण्यात आला. “पार्क्सजर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासपेपरचे मुख्य लेखक रोहीत सिंग असून त्यांना शिकारविरोधी आणि वन्यजीव कायदा अंमलबजावणीचा १५ वर्षाचा अनुभव आहे. सध्या डब्ल्यूडब्ल्यूएफ वन्यजीव गुन्हेच्या शुन्य शिकारीचे ते नेतृत्त्व करत आहेत. त्यांच्यासह पाकिस्तानमधील रिझवान अझीझ, अमेरिके तील विलियम मोरेटो, दक्षिण अफ्रिकेतील खिस गॅलिअर्स, ऑस्ट्रेलियातील सिऑन विलमोअर आर्दीसह भारतातून पेंच व्याघ्रप्रकल्पा ल
सहाय्यक वनसंरक्षक. अतुल देवकर, एक्सप्लोरिग वूमनहूडच्या दीपाली देवकर सर्वेक्षणात सहभागी झाल्या.

Get Involved